निसर्ग प्रेमी सायकल रायडर नितांत चव्हाण याचा सिंधुरत्न फाऊंडेशनच्यावतीने सत्कार
कणकवली ता.०६-:* जागतिक पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून सायकलपटू नितांत राजन चव्हाण याचा सिंधुरत्न फाऊंडेशन मार्फत सत्कार करण्यात आला. नितांत याने चौदा दिवस सायकल प्रवास करत पर्यावरणाचे महत्त्व समाजाला पटवून दिले होते. त्यामुळे पर्यावरण दिनाच्या औचित्यावर सिंधुरत्न फाऊंडेशनच्या अध्यक्षा अभिनेत्री अक्षता कांबळी आणि त्यांच्या सहकारी महिलांनी नितांतचा छोटेखानी सत्कार केला. यावेळी सिंधुरत्न फाऊंडेशनचे सिद्धेश कांबळी, अनुज…
