श्री. मनीष दळवी ;
वेंगुर्ला येथे रक्तदान शिबिरात ६७ जणांचे रक्तदान
वेंगुर्ला
मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कुशल कार्यपद्धतीने राज्यात विकासकामे, लोककल्याणकारी योजना आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी सातत्याने कार्य केले आहे. आज रक्तदानासारखा समाजोपयोगी उपक्रम आयोजित करणे ही त्यांच्या सामाजिक कार्याची एक उत्तम पद्धत आहे. रक्तदान ही मानवतेची सर्वोच्च सेवा असून एका रक्तदात्यामुळे अनेकांना जीवनदान मिळू शकते. त्यामुळे प्रत्येक निरोगी व्यक्तीने नियमित रक्तदान करणे ही काळाची गरज आहे. सर्व आयोजक संस्थांनी सातत्याने राबविलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी वेंगुर्ला येथे बोलताना केले. भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस, हनुमान मित्र मंडळ -जुना स्टॅण्ड, वेंगुर्ला, छत्रपती मित्र मंडळ -कॅम्प-भटवाडी, वेंगुर्ला तसेच राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभाग, बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आज बुधवारी वेंगुर्ला येथे
आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या शिबिरात ६७ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. सिंधुदुर्ग जिल्हा बँके अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचे उदघाट्न करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई,
भाजपा तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, पंचायत समिती सभापती शंकर घारे, आडेली पं. स. सदस्य नितीन मांजरेकर, आसोली पं. स. सदस्य संकेत धुरी, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, भाजपा तालुका सरचिटणीस वसंत तांडेल, होडावडा उपसरपंच राजबा सावंत, नगरसेवक प्रणव वायंगणकर, सचिन शेट्ये, रवींद्र शिरसाट, प्रीतम सावंत, सुधीर पालयेकर, नगरसेविका सुषमा प्रभूखानोलकर, आकांक्षा परब, गौरी मराठे, शितल आंगचेकर, काजल कुबल, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसचे अध्यक्ष प्रा. डॉ. सचिन परुळकर, सचिव विवेक तिरोडकर, साईप्रसाद नाईक, मनवेल फर्नांडिस, वृंदा गवंडळकर, भाजपा शहर अध्यक्ष श्रेया मयेकर, भाजपा तालुका चिटणीस नितीन चव्हाण, नितीन परब, सायमन आल्मेडा, मारुती दोडशानट्टी, संतोष सावंत, श्रेयस परब, मनोहर तांडेल, दशरथ गडेकर, योगेश खानोलकर, शिरोडा माजी उपसरपंच राहुल गावडे, अणसूर सरपंच सत्यविजय गावडे, प्रकाश रेगे, नामदेव सरमळकर, महेश प्रभुखानोलकर, महेश राऊळ, अमेय धुरी, मच्छिमार नेते दादा केळुसकर तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हे वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस यांचे सलग ४१ वे रक्तदान शिबिर ठरले. युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले.या रक्तदान शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
रक्तदान चळवळीच्या माध्यमातून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्यासाठी अनेक संस्था प्रयत्नशील असून या शिबिराद्वारेही समाजाप्रती आपली बांधिलकी अधोरेखित करण्यात आली. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व आयोजक संस्था, स्वयंसेवक, वैद्यकीय पथक तसेच रक्तदाते यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सचिन परुळकर यांनी व डॉ. गोविंद धुरी यांनी आभार मानले.
