Headlines

स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रशांत बागडे यांनी मालवण ग्रामीण रुग्णालय येथे पदभार स्वीकारला

नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी यांच्याकडून स्वागत

मालवण दि प्रतिनिधी :

मालवण ग्रामीण रुग्णालय येथे महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या आदेशाने स्त्रीरोग तज्ञ व बाल रोग तज्ञ हे दोन वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रशांत बागडे यांनी पदभार स्वीकारत रुग्ण सेवेत हजर झाले. यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, आरोग्य सभापती पुनम चव्हाण, महिला बाल कल्याण सभापती अन्वेशा आचरेकर यांसह नगरसेवक, नगरसेविका तसेच शिवसेना, भाजपा पदाधिकारी यांच्या वतीने स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रशांत बागडे यांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

डॉ. प्रशांत बागडे हे गेली 9 वर्षे विविध रुग्णालयात रुग्णसेवा करत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र लोणंद येथून त्यांनी सेवेची सुरवात केली. त्यानंतर सायन हॉस्पिटल मुंबई, महिला रुग्णालय सोलापूर येथे त्यांनी सेवा दिली आहे.

आमदार निलेश राणे यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेवून मतदारसंघातील आरोग्यस्थितीचा अहवाल सादर केला होता. जनतेला आरोग्य सेवेच्या दृष्टीने मालवण शहरातील ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती मांडत या रुग्णालयाला उपजिल्हारुग्णालय म्हणून दर्जा देत सुविधा देण्याची मागणी केली होती. त्यानुसार तत्काळ उपाययोजना करत स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रशांत बागडे यांची मालवण ग्रामीण रुग्णालयासाठी नियुक्ती करण्यात आली.

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील तसेच नगरसेवक सिद्धार्थ जाधव, नगरसेवक महेश कांदळगांवकर, भाग्यश्री मयेकर, निना मुंबरकर, अश्विनी कांदळकर, महानंदा खानोलकर, दर्शना कासवकर यांसह शिवसेना तालुका प्रमुख मधुरा तुळसकर, मार्टीन फर्नांडिस, लुड्डीन फर्नांडिस, यांसह भाजपा पदाधिकारी पुजा वेरलकर, महिमा मयेकर, तारका चव्हाण, अमृता फाटक, संतोषी कांदळगांवकर, दिव्या कोचरेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page