१२ जून रोजी कसाल येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

ओरोस ता.०५-:वीर बलीदानी कर्नल मनीष कदम कीर्तिचक्र शाखा ओरोस व राष्ट्रीय स्वधर्म संस्कार मंडळ देवगड यांचे संयुक्त विद्यमाने ‘राजा शिवछत्रपती जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा २०२२’ या स्पर्धेचे आयोजन रविवार दि १२ जून रोजी सकाळी १० वा. कसाल हायस्कूल येथे करण्यात आलेले आहे.

या स्पर्धेचे आयोजन नागरिकांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे विषयी असलेल्या अलौकिक विचारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी करण्यात आले आहे. तरी आपल्या संपर्कातील विद्यार्थी तरुण-तरुणी, नागरिक यांना या स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहन आयोजक यांच्यावतीने करण्यात आले आहे. पहिली ते चौथी, पाचवी ते आठवी, नववी ते बारावी आणि खुला गट अशा एकूण चार गटांत ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.

पहिली ते चौथी गटासाठी “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील कथा”, पाचवी ते आठवी गटासाठी “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंगातील बोध”, नववी ते बारावी गटाला “द्रष्टा राजा शिवछत्रपती” आणि खुल्या गटासाठी “राजा शिवछत्रपतींचे सुशासन” हे विषय गट निहाय देण्यात आले आहेत. विजेत्या स्पर्धकांना गौरवचिन्ह, प्रशस्तीपत्र, रोख रक्कम व सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.९ जून पर्यंत नावनोंदणी करावयाची आहे. अक्षय शेलटे ९१३०९१३८६०, संजय जोईल ९४२१२६४३८१, श्रेया कुलकर्णी ८०१०३३४९८४ येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page