गायत्री राठोड, सुश्रुत नानल द्वितीय, तृतीय
ओरोस ता.०६-:सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कल सिंधुदुर्गच्या मान्यतेने श्री चेस अॅकॅडमी कणकवली व सुयोग चेस अॅकॅडमी सुकळवाड यांच्या संयुक्त विद्यमाने १६ वर्षाखालील खेळाडूंसाठी जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेच आयोजन ओरोस येथे करण्यात आल होते.
या स्पर्धेत प्रथम भावेश कुडतरकर (सावंतवाडी ) द्वितीय – गायश्री राठोड ( फोंडाघाट ) तृतीय – सुश्रुत नानल यांनी बाजी मारली. स्पर्धेच उद्घाटन माजी पं स सदस्या सुप्रिया वालावलकर यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी व्यासपिठावर सिंधुदुर्म जिल्हा चेस सर्कलचे अध्यक्ष सुयोग धामापूरकर , उपाध्यक्ष सुशिल निब्रे, सचिव श्रीकृष्ण आडेलकर, सामाजिक कार्यकर्ते सुनिल जाधव आदी मान्यवर पालक व खेळाडू उपस्थित होते. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे – प्रथम भावेश कुडतरकर (सावंतवाडी ) द्वितीय – गायश्री राठोड ( फोंडाघाट ) तृतीय – सुश्रुत नानल, चतुर्थ – विभव राऊळ (सावंतवाडी ) पाचवा – राजेश वीरनोडकर, सहावा अथर्व कापडी (ओरोस ) सातवा – सोहम देशमुख (सावंतवाडी ) आठवा – श्रेया शेळके (वैभववाडी ) नववा – तनिष्का आडेलकर ( कणकवली ) दहावा – रुद्राक्ष राठोड – फोंडाघाट स्पर्धेची बक्षिसे रौनक पटेल ई स्टोअर इंडिया प्रमोटर, मयुरेश आपटे, सुशिल निब्रे यांनी प्रायोजित केली होती . बक्षिस वितरणवेळी रौनक पटेल , सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कल सिंधुदुर्गचे अध्यक्ष सुयोग धामापूरकर, सचिव तथा राष्ट्रीय पंच श्रीकृष्ण आडेलकर, उपाध्यक्ष सुशिल निब्रे आदी मान्यवर व पालक उपस्थित होते.
