पर्यावरण दिनाचे औचित्य;नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे आयोजन
सावंतवाडी ता.०६-:* नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था कोकण विभाग शाखा सावंतवाडीच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून माजगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले. हा कार्यक्रम नेफडो सिंधुदुर्गच्या महिला उपाध्यक्षा पूजा गावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष जोवेल डिसिल्वा, सावंतवाडी तालुकाध्यक्ष प्रदीप देसाई, तालुका सचिव प्रदीप सावंत, अँड. चंद्रशेखर ऊर्फ सचिन गावडे, संदीप गावडे, साक्षी गावडे, प्राजक्ता सावंत, निवृत्त मुख्याध्यापक विठ्ठल गावडे, अभिषेक कशाळीकर अज्ञेय गावडे, संचित गावडे तसेच आयुषी गावडे, सृष्टी गावडे उपस्थित होते.
यावेळी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यात मसाल्याच्या पदार्थाची व सुपारीच्या रोपाची प्रामुख्याने लागवड करण्यात आली या वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारी माजगावमधील गोविंद प्लाझातील रहिवासी व गावडे कुटुंबीयांनी घेतली आहे यावेळी उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमास व जागतिक पर्यावरण दिवस शुभेच्छा व्यक्त केल्या.
