११ जूनला होणार स्व.एकनाथ ठाकूर स्मृती पुरस्कार सोहळा पुढे ढककला

लवकरच पुरस्कार सोहळ्याची तारीख जाहीर होणार

वेंगुर्ला ता.०६-:* सुविख्यात अभिनेते यांना जाहिर झालेला स्व.एकनाथ ठाकूर स्मृती पुरस्कार महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचा हस्ते वेंगुर्ला येथे ११ जून प्रदान करण्यात येणार होता. मात्र, ३ जून रोजी सुधीर मुनगंटीवार यांच्या वडिलांचे नागपूर येथे निधन झाल्याने हा सोहळा पुढे ढकलल्याचे कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.अमेय देसाई यांनी सांगितले.

२०१७ सालापासून सुरु झालेला स्व.एकनाथ ठाकूर स्मृती पुरस्कार यंदा सुविख्यात अभिनेते, उत्तम वक्ते, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचे अभ्यासक तसेच कर्करोगावर यशस्वीपणे मात करणारे शरद पोंक्षे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण ११ जून रोजी दुपारी ३ वाजता वेंगुर्ला येथील मधुसूदन कालेलकर सभागृहात सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार होते.

तसेच याच कार्यक्रमात समाजसुधारक सावरकर यावर शरद पोंक्षे यांचे जाहीर व्याख्यानही आयोजित केले होते. मात्र, सुधीर मुनगंटीवार यांच्या वडिलांचे म्हणजेच डॉ.सच्चिदानंद मुनगंटरीवार यांचे ३ जून रोजी नागपूर येथे निधन झाले. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक, लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे अध्यक्ष, चिन्मय मिशनचे अध्यक्ष, डॉ.हेगडेवार जन्मशताब्दी सेवा समितीचे अध्यक्ष अशा विविध जबाबदा-या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या.

१९६७ मध्ये त्यांनी भारतीय जनंसघातर्फे चंद्रपूर विधानसभेची निवडणूक देखील लढविली होती. त्यामुळे नैतिकदृष्ट्या हा सोहळा पुढे ढकलणे संयुक्तिक असल्याचे कुडाळदेशकर सार्वजनिक गणेशोत्सव तथा मातोश्री कला क्रिडा मंडळ यांच्यावतीने डॉ.देसाई यांनी नमुद केले आहे. तसेच या पुरस्कार सोहळ्याची तारीख लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगितले.

You cannot copy content of this page