बँ नाथ पै सेवांगण मालवणचे आयोजन
ओरोस ता.०६-:* बॅ. नाथ पै सेवांगण मालवण आयोजित नवभारताचे शिल्पकार “पंडीत नेहरु” या स्पर्धेत शिवराज सावंत-मसुरे, अॅड. राम धुमाळ- धुळे यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. बॅ. नाथ पै सेवांगणच्यावतीने आयोजित या ऑनलाईन प्रश्नमंच स्पर्धेत राज्यभरातून ४८ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
या स्पर्धेचा बक्षीस समारंभ सेवांगणचे अध्यक्ष अॅड. देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष दीपक भोगटे, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर सेवांगणचे पदाधिकारी स्पर्धक यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन संपन्न झाला. सेवांगणचे विश्वस्त अरविंद परुळेकर यांनी सर्वांचे स्वागत केले. अॅड. संदीप निबाळकर यांनी आभार मानले. माधवी मेस्री हीने तांत्रिक बाजू सांभाळली. बॅ नाथ पै सेवांगणच्या वतीने विजेत्या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये अॅड. राम धुमाळ, शिवराज सावंत यांनी संयुक्त प्रथम क्रमांक मिळविला. धाकलू डवरी, नंदकुमार वडेर यांनी विभागून द्वितीय क्रमांक मिळविला. तृतीय क्रमांक मायलिन फर्नांडीस, सुर्यकांत साळुंके, श्रीकांत महाजन, प्रकाश उनकुले, अर्चना धुत्रे, तेजल ताम्हणकर, गुरुनाथ ताम्हणकर, साक्षी देसाई यांनी मिळविला. चौथा क्रमांक चैताली आंबेलकर, गणेश आंबेलकर, मानव आंबेलकर, किरण चव्हाण, सानिका तेली, वैष्णवी सुतार, योगिता पावसकर, विहान परब, गौरव परब, अनुष्का महेश वाळवे, प्रिया कुबल, श्रवण वाळवे, प्रणय वाळवे, लावण्या वाळवे, सावली वाळवे, जानवी ढोलम, रोहिणी मसुरकर यांनी मिळविला. तर उत्तेजनार्थ अनघा मालवणकर, स्नेहलता तेली, रोशन वाळवे, समिक्षा चव्हाण, अंतरा वाळवे, अनुष्का वाळवे यांनी पटकाविला.
