Headlines

कोमसाप मालवणच्या संगीत स्वराशा मैफिलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡मालवण ता.२२-:
कोमसाप शाखा मालवणच्या महिला विभागाने स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केलेला संगीत स्वराशा हा संगीत सोहळा नुकताच डॅफोडिल्स रिसॉर्ट आचरा येथे संपन्न झाला. या सोहळ्याचा शुभारंभ पुणे येथील ज्येष्ठ बासरी वादक विजयराव देसाई यांनी आशाताईंची आवडती चैती लोक धून वाजवून केला.

कोमसाप शाखा मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांच्या संकल्पनेने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या दहा गायिकांनी आपल्या सुरेल सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. यामध्ये रश्मी आंगणे, स्मिता हडकर, अर्चना जोशी , ऋतावरी वळंजू, वंदना राणे , वर्षाराणी अभ्यंकर , आदिती मसुरकर , देवयानी आजगावकर , श्रावणी प्रभू , स्वराशा कासले – या गायिकांनी आपल्या मधुर आवाजाने वातावरण मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा कदम यांनी केले
श्री मंदार सांबारी यांनी आगळीवेगळी काव्यरूपात प्रतिक्रिया देऊन कार्यक्रमाचे कौतुक केले.

कोमसाप मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल समस्त रसिकांतर्फे कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी कार्यक्रमाला कोमसाप जिल्हा संघटक रुजारिओ पिंटो, माजी उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, माजी गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मुळीक, सरपंच जेरॉन फर्नांडिस, सुनंदा कांबळे, अशोक कांबळी, बाबाजी भिसळे, निलेश सरजोशी , सदानंद कांबळी, सुरेश गावकर, विजय चौकेकर, पांडुरंग कोचरेकर, गुरुनाथ ताम्हणकर, सुरेंद्र सकपाळ, रामचंद्र कुबल, श्रुती गोगटे, मनाली फाटक, रमाकांत शेटये ,महादेव बागडे, प्रकाश पेडणेकर, चंद्रशेखर धानजी, विनोद कदम, सायली परब, नेहा बापट, उज्वला धानजी, मधुरा माणगावकर आदी कोमसापचे सदस्य व इतर रसिकवर्ग उपस्थित होते.

You cannot copy content of this page