कणकवली ता.०६-:* जागतिक पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून सायकलपटू नितांत राजन चव्हाण याचा सिंधुरत्न फाऊंडेशन मार्फत सत्कार करण्यात आला. नितांत याने चौदा दिवस सायकल प्रवास करत पर्यावरणाचे महत्त्व समाजाला पटवून दिले होते. त्यामुळे पर्यावरण दिनाच्या औचित्यावर सिंधुरत्न फाऊंडेशनच्या अध्यक्षा अभिनेत्री अक्षता कांबळी आणि त्यांच्या सहकारी महिलांनी नितांतचा छोटेखानी सत्कार केला.
यावेळी सिंधुरत्न फाऊंडेशनचे सिद्धेश कांबळी, अनुज कांबळी, मयुरा भंडारे, मीलन पाटील, स्नेहल तांबे उपस्थित होत्या. नितांत सायकल राईड करत समाजाला सायकलचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देत असतो. मोकळ्या माळरानावर सिडबॉल टाकून निसर्ग संगोपन करत असतो.
या वेळी नितांतने आपल्या १४ दिवस प्रवासातील अनुभव सांगितले. १४ दिवसात एकही वाईट अनुभव, वाईट व्यक्ती भेटली नाही, असे त्याने सांगितले. शेवटी अक्षता कांबळी यांनी नितांतच्या उज्ज्वल भविष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.
