Headlines

धोकादायक झाडांकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष का…?

अॅड. नीता सावंत-कविटकर यांचा सवाल:प्रशासनाने त्वरित ठोस उपाययोजना करून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे..

⚡सावंतवाडी, ता. २२-: गेल्या दोन दिवसांत सावंतवाडी शहरात झाडे कोसळण्याच्या घटना घडल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील जीर्ण व धोकादायक झाडांची वेळेत पाहणी करून आवश्यक ती छाटणी अथवा तोडणी करण्यात नगरपालिका प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप शिंदे शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख तथा नगरसेविका अॅड. नीता सावंत-कविटकर यांनी केला आहे.

त्या म्हणाल्या,”धोकादायक झाडांकडे दुर्लक्ष करून नगरपालिका प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. शहरातील धोकादायक झाडांच्या किमान फांद्यांची तातडीने छाटणी करण्यात यावी. यापुढे अशा प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. नगरपालिका प्रशासनाने त्वरित ठोस उपाययोजना करून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

तसंच ते पुढे म्हणाले, सार्वजनिक रस्त्यांवरील धोकादायक व जीर्ण झाडांची नियमित पाहणी करणे, आवश्यक ती छाटणी करणे आणि नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करणे ही नगरपालिका तसेच वृक्ष प्राधिकरणाची कायदेशीर जबाबदारी आहे. महाराष्ट्र (शहरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ नुसार वृक्ष प्राधिकरणावर झाडांचे संरक्षण, जतन आणि आवश्यक ती कार्यवाही करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व धोकादायक झाडांचे तातडीने सर्वेक्षण करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी अॅड. नीता सावंत-कविटकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page