Headlines

वेंगुर्ला शहरात 5 ठिकाणी एल.ई.डी.स्क्रीन कार्यान्वित करणार ; श्री.दिलीप गिरप

वेंगुर्ला
वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीमध्ये नागरिकांच्या मागणीनंतर बॅनरमुक्त वेंगुर्ला शहर चा नुकताच एकमुखी ठराव घेण्यात आला. बॅनरमुक्त वेंगुर्लाच्या दृष्टीने एल. ई. डी.स्क्रीन बसविण्याबाबत आजच्या विशेष सभेत चर्चा करून निश्चित करण्यात आले. वेंगुर्ला शहरात एकूण 5 ठिकाणी हे एल.ई.डी. स्क्रीन श्री गणेश चतुर्थी पूर्वी कार्यान्वित करण्यात येणार आहेत, अशी माहिती वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी दिली. वेंगुर्ला नगरपरिषदेची विशेष सभा सोमवारी श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी हा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, विविध समिती सभापती, उपसभापती, नगरसेवक, नगरसेविका, प्रशासकीय अधिकारी अभिजीत पाटील आदी उपस्थित होते. यावेळी घनकचरा व्यवस्थापन बाबत चर्चा करण्यात आली.तसेच ‘पर्यावरण पूरक गणेश सजावट स्पर्धा 2026’ चे आयोजन बाबत माहिती देण्यात आली.

You cannot copy content of this page