५० ते ७० गणेशमूर्तींची वाहतूक; राजू साटेलकर यांची प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी..
⚡सावंतवाडी ता.०८-:
होळीचे भाटले ते बांडिवडेवाडी या सार्वजनिक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने हा मार्ग अरुंद आणि धोकादायक बनला आहे. वारंवार समस्या निर्माण होऊनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने राजू साटेलकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा रस्ता तातडीने मोकळा करण्याची मागणी राजू साटेलकर यांनी केली आहे.
ते महणाले,गणेशोत्सव काळात सर्वेकरपासून पाच मार्गांवरून सुमारे ५० ते ७० गणेशमूर्ती ग्रामस्थ आपल्या घरी घेऊन जाणार आहेत. मात्र, सध्याच्या परिस्थितीत या रस्त्यावरून गणेशमूर्ती घेऊन जाणे सुरक्षित नाही. गणपती बाप्पांना घरी आणण्यासाठी रस्त्यावरून सुरक्षितपणे वाहतूक होणे गरजेचे असून, अतिक्रमणामुळे मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.त्यामुळे सप्टेंबर २०२६ पूर्वी रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे तातडीने हटवून रस्ता पूर्णपणे मोकळा व सुरक्षित करण्यात यावा, अशी अंतिम विनंती ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.गणेशोत्सवापूर्वी कारवाई न झाल्यास ३० ते ५० गणेशमूर्ती घेऊन येणाऱ्या ग्रामस्थांसमोर दुसरा कोणताही मार्ग उपलब्ध राहणार नाही. त्यामुळे पर्याय नसल्याने सर्व गणेशमूर्तींची रस्त्यावरूनच वाहतूक करावी लागणार असून, त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, असा इशाराही रजू साटेलकर यांनी दिला आहे.
ग्रामस्थांचा संघर्ष करण्याचा हेतू नसून, गणपती बाप्पांना सुरक्षितपणे घरी आणण्यासाठी सार्वजनिक रस्ता मोकळा करून देणे एवढीच मागणी आहे. प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन गणेशोत्सवापूर्वी तातडीने प्रभावी कारवाई करावी, अशी मागणी समस्त ग्रामस्थ व रहिवासी, धाकरे,यांनी केली आहे.
यावेळी. आमदार, सिंधुदुर्ग, ओरोस,मा. पोलीस अधीक्षक, ओरोस,मा. पोलीस अधीक्षक, वेंगुर्ला,मा. तहसीलदार, सावंतवाडी,मा. गटविकास अधिकारी, सावंतवाडी,मा. सरपंच व ग्रामसेवक, धाकोरे,मा. ग्रामपंचायत मुख्य अधिकारी, ओरोस,मा. जिल्हा परिषद अध्यक्ष, ओरोस,मा. दौलत पाटील, धाकोरे,मा. पालकमंत्री महोदय,मा. आमदार, सावंतवाडी,मा. सार्वजनिक बांधकाम, वेंगुर्ला,मा. सार्वजनिक बांधकाम, सावंतवाडी यांनी दखल घेण्याची मागणी केली.
