Headlines

वेंगुर्ला तालुका युवासेना तालुकाप्रमुखपदी विकी उर्फ गंगाराम केरकर यांची नियुक्ती

वेंगुर्ला
उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या वेंगुर्ला तालुका युवासेना प्रमुखपदी आसोलीचे माजी उपसरपंच विकी उर्फ गंगाराम केरकर यांची नियुक्ती करण्यात आली. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर १० पैकी १० जागांवर दणदणीत विजय मिळवणारे युवासेनेचे सिनेट सदस्य मिलिंद साटम, ॲड. अल्पेश भोईर, स्नेहा गवळी, मयुर पांचाळ, डॉ. धनराज कोहचाडे यांच्या विशेष उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, जिल्हा उपप्रमुख सागर नाणोसकर, माणगाव खोरे पंचायत समिती सदस्य तथा कुडाळ तालुका युवासेना प्रमुख योगेश धुरी यांच्या हस्ते विकी केरकर यांना नियुक्तीपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय गावडे, उपतालुकाप्रमुख सुमन कामत ओंकार पंडित, तुषार परब, शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पक्षाशी एकनिष्ठ, युवा वर्गात चांगली क्रेझ आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याने त्यांची निवड करण्यात आल्याचे जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी सांगितले.
या निवडीबद्दल माजी आमदार वैभव नाईक, जिल्ह्यातील सर्व शिवसेना, युवासेना पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून वेंगुर्ला तालुक्यातूनही त्यांचे अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page