कणकवली : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, शहराध्यक्ष इम्रान शेख, युवक जिल्हाध्यक्ष निशिकांत कडुलकर, कणकवली विधानसभा अध्यक्ष सुभाष सावंत, प्रांतिक सदस्य विलास गावकर, शहर उपाध्यक्ष सचिन अडुळकर, जिल्हा सचिव सतीश पाताडे, तालुका सचिव सत्यविजय परब, मुश्ताक काझी, सईद काझी, हानीफ काझी, जिल्हा प्रतिनिधी केदार खोत, बाळू मेस्त्री, साईल सुतार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
