Headlines

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मातोश्री विद्यालयाचे यश

⚡बांदा ता.२०-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व वेंगुर्ले पंचायत समिती यांच्या माध्यमातून आयोजित ४९ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात रेडी येथील मातोश्री पार्वती राऊत विद्यालय (इंग्रजी माध्यम) प्रशालेने माध्यमिक गटात प्रथम क्रमांक मिळविला. मान्यवरांच्या हस्ते प्रशालेच्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.प्रशालेच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष प. म. राऊत, चिटणीस डॉ. विनय राऊत, मुख्य सल्लागार एम. पी. मेस्त्री, प्रशालेच्या मुख्याध्यापिका गीता…

Read More

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त जि.प. शाळेतील मुलांना वह्यांचे वाटप…

दोडामार्ग ता.२०-:भारतीय जनता पार्टीचे नेते महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम अन्न नागरी पुरवठा व ग्राहक मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आज दोडामार्ग येथील जि.प.मराठी शाळेतील मुलांना वह्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष दिपक गवस,कोनाळ ग्रामपंचायत सरपंच पराशर सावंत, युवा मोर्चा कार्यकर्ते स्वप्नील गवस,साजन गवस,विनायक…

Read More

असनिये गावचे माजी सरपंच गजानन सावंत यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन…

बांदा/प्रतिनिधीअसनिये गावचे माजी सरपंच, भाजप कार्यकर्ते तथा श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक गजानन लाडू सावंत (वय ५२) यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने कुडाळ येथे खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या आकस्मिक अकाली निधनाने सावंत कुटुंबीयांसह असनिये, बांदावासिय व त्यांच्या मित्र परिवाराला मोठा धक्का बसला आहे.शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील एका दातृत्ववान व्यक्तीला मुकल्याने असनिये गावावर…

Read More

भाजपच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गौरव व खाऊ वाटप

⚡वेंगुर्ला ता.२०-: सिंधुदुर्ग चे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस पूर्ण जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. याच वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी मातोंड, वेंगुर्ला यांच्या तर्फे येथील न्यू इंग्लिश स्कूल मातोंड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा…

Read More

नेटवर्क मिळत नसल्याने ऑफलाईन रास्त धान्य द्या

नगरसेविका मनीषा जामसंडेकर यांची मागणी देवगडजामसंडे येथील रास्त दराचे दुकानांमधून थंब मशीन द्वारे धान्य वितरण केले जाते .त्या मशीनला वारंवार नेटर्वक समस्या निर्माण होत असल्याने ग्राहकांना तासंनतास ताटकळत उभे रहावे लागते.त्यामुळे पूर्वी प्रमाणे ऑफलाइन पद्धतीने लेखणी द्वारे पावती करून रेशन देण्याच्या पद्धतीचा अवलंब करावा जेणेकरून ग्राहकांना त्रास होणार नाही व वेळही वाचेल अशी मागणी प्रभाग…

Read More

चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले असताना सीसीटिव्ही बंद हे भूषणावह नाही

शांतता समिती बैठकीत उपस्थितांची तीव्र नाराजी सावंतवाडी दि.२० सप्टेंबर (प्रतिनिधी)येता नवरात्र उत्सव शांततेत , निर्भय वातावरणात साजरा करण्याचे आवाहन पोलीस उपनिरीक्षक अमित गोते यांनी केले.यावेळी शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून सीसीटीव्ही कॅमेरे बंद असणे भूषणावह नाही असे उपस्थित सदस्यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सोनुर्ली मंदिरातील चोरीसह कोलगाव, सावंतवाडी शहरात वाढलेल्या चोऱ्या…

Read More

नेत्र शिबिरातील चष्म्याचे वाटप २५ सप्टेंबर रोजी

सावंतवाडी – 20रोटरी क्लब, इनरव्हील क्लब, रोटराॕक्ट क्लब, सावंतवाडी, रोटरी क्लब, बांदा,आणि सावंतवाडी तील युवा रक्तदाता संघटना, मुस्लिम हेल्थ अॕन्ड वेलफेअर फाउंडेशन, सार्वजनिक गणेश उत्सव, चितार आळी आणि सावंतवाडी नगरपरिषद तसेच सावंतवाडी तालुका पत्रकार संघ सावंतवाडी या सर्व संस्थांनी सहभागातुन आणि व्हीजन आरएस लॕब प्रा.ली.मुंबई यांंच्या सहयोगाने घेतलेल्या “नेत्र-शिबिराचे” चष्मे आज रोजी कोलकत्ता येथून प्राप्त…

Read More

आरोस परिवर्तन मंडळाकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

⚡बांदा ता.२०-: आरोस गावातील 25 कुटुंबांना श्री देवी माऊली मंदिर येथे आरोस परिवर्तन युवक मंडळाच्या पुढाकाराने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे औचित्य साधून आरोस गावचे सुपुत्र लेखक व कवी दिपक पटेकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख मान्यवर म्हणून ग्रामपंचायत सदस्या मनीषा परब, लेखक व कवी दीपक पटेकर, ज्येष्ठ नागरिक शरद परब, पोलीस पाटील महेश…

Read More

शिवसेना नेते बाळा गावडे यांच्या गाडीला अपघात…

गाडीवरील नियंत्रण सुटल्याने घडला अपघात; गाडीचे नुकसान.. ⚡सावंतवाडी ता.२०-: शिवसेनेचे नेते बाळा गावडे यांच्या गाडीला सालईवाडा भागात अपघात झाला असून, गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठड्याला धडकली आहे. या अपघातातून गावडे सुखरूप असून, गाडीचे मात्र नुकसान झाले आहे. हा अपघात आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

Read More

वेंगुर्ल्यामध्ये मुलांना पळवून नेणारी टोळी असण्याची शक्यता पोलिसांनी नाकारली

संशयास्पद व्यक्ती आढळल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला तालुक्यात सद्या सोशल मिडियावर ‘मुलांना पळवून नेणारी टोळी वेंगुर्लेत‘ असा मेसेज फिरत असून यामुळे उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान वेंगुर्ला पोलीसांनीही या संदर्भात चौकशी सुरु केली असून अशा प्रकारची टोळी असण्याची शक्यता त्यांनी प्रथम दर्शनी नाकारली आहे. मात्र, शहरात किवा तालुक्यात कोणी संशयास्पद…

Read More
You cannot copy content of this page