मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त जि.प. शाळेतील मुलांना वह्यांचे वाटप…

दोडामार्ग ता.२०-:भारतीय जनता पार्टीचे नेते महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम अन्न नागरी पुरवठा व ग्राहक मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आज दोडामार्ग येथील जि.प.मराठी शाळेतील मुलांना वह्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष दिपक गवस,कोनाळ ग्रामपंचायत सरपंच पराशर सावंत, युवा मोर्चा कार्यकर्ते स्वप्नील गवस,साजन गवस,विनायक खडपकर,सुमित म्हाडगुत,सर्वेश गवस,लक्ष्मण खडपकर,शुभम मुळगावकर, तसेच शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page