वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील खानोलकर दशावतार नाट्यमंडळ, खानोली मधील खलनायक भूमिका साकारणारे दशावतार कलावंत ओंकार उर्फ दया सत्यविजय पायनाईक यांचा मुंबई मालाड आपापाडा येथे विलास सावंत मित्रमंडळ मुंबई यांच्यामार्फत शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मुंबई येथे आयोजित महोत्सवात त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी मित्रमंडळाचे पदाधिकारी विलास सावंत, अमय सावंत, श्री. चाचे, मयूर पायनाईक तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दया पायनाईक हे वेंगुर्ला तालुक्यातील पेंडूर नेवाळेवाडी येथील रहिवासी असून ते गेली वीस वर्षे दशावतारी कलावंत म्हणून आपली छाप पाडत आहेत. तसेच यावेळी नाट्यकंपनीचे मालक बाबा मेस्त्री, जुने जाणकर कलाकार पुरुषोत्तम खेडेकर यांचाही सत्कार करण्यात आला.

