⚡वेंगुर्ला ता २०-: शनिवारपासून सुरू होणाऱ्या तुलसी विवाहाची लगबग वाढली आहे. त्यानिमित्त गेले चार दिवस घरोघरी तुलसी वृंदावन रंगविण्याचे काम सुरू होते. तर आज शुक्रवारी वेंगुर्ला बाजारपेठेत तुलसी विवाहासाठी लागणारे साहित्य विक्रीस आले होते.
दिवाळीनंतर येणाऱ्या कार्तिक शुद्ध द्वादशीला तुलसी विवाह करण्याची प्रथा आहे. त्यानुसार घरोघरी तुलसी विवाह पार पाडले जातात. या पार्श्वभूमीवर गेले चार दिवस विविध रंगांनी तुलसी वंृदावन रंगविण्याचे काम सुरू आहे. तर शुक्रवारी विवाहासाठी लागणारे साहित्य विक्रीस आले होते. दरम्यान, यावेळी प्रबोधिनी आणि भागवत अशा दोन एकादशी आल्याने जे नागरिक प्रबोधिनी एकादशी व्रत करणार आहेत ते शनिवारी तुलसी विवाह करतील तर भागवत एकादशी व्रत करणारे नागरिक हे रविवारी तुलसी विवाह करणार आहेत. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने त्यादिवशी जास्तीत जास्त तुलसी विवाह पार पडण्याची शक्यता आहे. शनिवारी आणि रविवारी बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून येणार आहे.
फोटोओळी – तुलसी विवाहाच्या पार्श्वभूमीवर घरोघरी तुलसी वृंदावन रंगविण्याचे काम सुरू आहे.

