⚡सावंतवाडी ता.२०-: सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी तौकीर शेख यांची निवड करण्यात आली आहे. कोकण विभागीय काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष यासीर बुबेरे यांनी या निवडीची अधिकृत घोषणा केली.

यासीर बुबेरे हे जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांच्या उपस्थितीत तौकीर शेख यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या निवडीमुळे जिल्ह्यातील काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तौकीर शेख यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्ह्यात काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी त्यांनी सक्रियपणे कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
