⚡वेंगुर्ला ता.१९-: वेंगुर्ला तालुक्यातील
तुळस प्राथमिक आरोग्य केंद्रास शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्यामार्फत स्टॅन्ड फॅन भेट देण्यात आला. मागणीनुसार शिवसेनेमार्फत त्वरित दखल घेण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी शिवसेना विभागप्रमुख संजय परब, उपविभागप्रमुख रवी केळुस्कर, माजी चेअरमन सुनील तुळसकर, माजी सरपंच आप्पा परब, शाखाप्रमुख जीजी माळकर, बुधप्रमुख राजेश राय, रामचंद्र शिरोडकर, दादा परब, राजू पालकर, यशवंत नाईक, डॉ. मिलिंद , प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. आरोग्य केंद्राच्या वतीने जिल्हाप्रमुख संजू परब यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

फोटो :
