ग्रामस्थांनी विविध प्रश्न मांडले; सभापती सिद्धेश रावराणे यांचे मार्गदर्शन

वैभववाडी प्रतिनिधी.
निमअरुळे ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित ग्रामसभेत गावातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासह पाणी नियोजन, शासकीय योजनांची माहिती तसेच शेतकरी व महिलांसाठी प्रमाणपत्र वाटप अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी सभापती सिद्धेश रावराणे, जिल्हा परिषद सदस्य रिद्धी रितेश सुतार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी गावातील सुरू असलेली व प्रस्तावित विकासकामे, पाणीपुरवठ्याचे नियोजन आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्याबाबत चर्चा झाली.
ज्ञग्रामस्थांनीही गावातील विविध समस्या आणि विकासकामांसंदर्भातील अनेक मुद्दे उपस्थित केले. यावर उपस्थित पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी समाधानकारक चर्चा करून ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
यावेळी सरपंच सज्जन माईणकर, अशोक आंगवलकर, तालुका कृषी अधिकारी देशमुख, उप तालुका कृषी अधिकारी प्रकाश लांबोर ग्रामसेवक विद्याधर सावंत, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
