मालवण दि प्रतिनिधी

कट्टा येथील श्री विठ्ठल रखुमाई व लक्ष्मी नारायण मंदिरात दि १२ नोव्हेंबर पासून सुरु झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची आज पालखी सोहळ्याने उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सांगता झाली . या सोहळ्याच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह, कार्तिक स्नान, काकड आरती, तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही संपन्न झाले. या उत्सवाच्या निमित्ताने दि २१ नोव्हेंबर रोजी दशावतारी नाटक प्रयोग आयोजित करण्यात आला असून दिनांक २४ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमेचे औचीत्य साधून दीपोत्सव आणि तुलसी विवाह सोहळा पार पडणार आहे
कट्टा येथील श्री विठ्ठल रखुमाई व श्री लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्ट कट्टा यांच्या वतीने श्री विठ्ठल रखुमाई व श्री लक्ष्मीनारायण मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सोहळा पार पडला या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त मंदिरात दररोज पहाटे काकड आरती, सकाळी व सायंकाळी भजन, हरिनाम संकीर्तन, आरती व विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले आणि धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतला.
सप्ताहादरम्यान विविध भजन मंडळांनी भजनसेवा सादर केली. तसेच कार्तिक स्नान, हरिनाम सप्ताहाची सांगता, श्रींच्या पालखी सोहळ्यासह कार्यक्रम पार पडले.
शनिवार दिनांक २१ नोव्हेंबर २०२६ रोजी कार्तिकी एकादशी निमित्त पहाटे साडे पाच वाजता काकड आरती, सकाळी साडे आठ वाजता महापुरुष विद्या (महापूजा ) व तीर्थप्रसाद होणार आहे तर सायंकाळी ७ वाजता आरती व भजने तसेच सिद्धेश्वर पारंपारिक दशावतारी नाट्य मंडळ कसइ दोडामार्ग यांचा दशावतारी नाट्य प्रयोग होणार आहे तर सोमवार दिनांक २४ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून पहाटे साडेपाच वाजता काकड आरती आणि रात्री साडेआठ वाजता आरती भजने होणार आहेत सायंकाळी सात वाजता दीपोत्सव आणि रात्री आठ वाजता दिंडी व आरती होणार आहे तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन
करण्यात आले आहे
