Headlines

बाल संसदेत सानिका गावडे मांडणार बालकांच्या समस्या…

⚡बांदा ता.१९-:
गावातील मुलांच्या समस्या आणि त्यांच्या हक्कांचे प्रश्न आता थेट राज्यस्तरीय व्यासपीठावर मांडले जाणार आहेत. सावंतवाडी तालुक्यातील पाडलोस गावच्या ओम गणेश बालसभेच्या अध्यक्षा सानिका रामा गावडे शुक्रवारी पुणे येथे होणाऱ्या विशेष बाल संसदेत गावाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बालस्नेही ग्रामपंचायत म्हणून निवड झालेल्या पाडलोस ग्रामपंचायतीसाठी ही महत्त्वपूर्ण संधी आहे. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), युनिसेफ आणि महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने या बाल संसदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या संसदेत सानिका गावातील मुलांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, त्यांच्या गरजा आणि अपेक्षा मांडणार आहे. तसेच ओम गणेश बालसभेच्या माध्यमातून आजवर करण्यात आलेल्या कामांची माहितीही ती सादर करणार आहे.
ग्रामीण भागातील बालकांना आपल्या प्रश्नांबाबत थेट राज्यस्तरीय व्यासपीठावर व्यक्त होण्याची संधी या उपक्रमातून मिळणार आहे. त्यामुळे पाडलोस गावातील बालकांचे प्रश्न आणि बालसभेचे कार्य राज्यस्तरावर पोहोचणार आहे.

फोटो ——-
ओम गणेश बालसभा अध्यक्ष सानिका गावडे यांचे अभिनंदन करताना अधिकारी नारायण परब.

You cannot copy content of this page