Headlines

माजी मंत्री भाई गिरकर यांच्याकडून दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत

देवगड / प्रतिनिधी
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त आणि पीडित नागरिकांच्या मदतीसाठी माजी मंत्री तथा समता परिषद, मुंबईचे अध्यक्ष विजयभाई गिरकर यांनी आज मुख्यमंत्री सहायता निधीला १ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

​आज विधानभवन येथे विजयभाई गिरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेऊन हा मदतीचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला.

राज्यातील संकटात सापडलेल्या नागरिकांना तातडीने दिलासा मिळावा, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ही आर्थिक मदत करण्यात आली आहे. याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार हे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सामाजिक उपक्रमाचे आणि मदतीचे स्वागत करत गिरकर यांचे आभार मानले.

You cannot copy content of this page