⚡सावंतवाडी ता.१९-: इंडियन ऑईल पुरस्कृत तसेच महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन, जिल्हा सिंधुदुर्ग आणि मालवण टेबल टेनिस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा १४ व १५ नोव्हेंबर रोजी मालवण येथील जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलच्या सुलोचना श्रीपाद पाटील मेमोरियल हॉलमध्ये उत्साहात झाल्या.

या स्पर्धेत ११ ते १३ वर्षांखालील मुलांच्या गटात सेंट्रल इंग्लिश स्कूल ,सांवतवाडी शाळेच्या कु .नहुष नंदकिशोर पारगावकर याने विजेतेपद पटकावले . त्याला प्रमाणपत्र, चषक आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.त्याला प्रशालेच्या क्रीडा शिक्षिका श्रीम. मारिया आल्मेडा व त्याचे टेबल टेनिसचे प्रशिक्षक श्री . नितीन तळेकर यांनी मार्गदर्शन केले .
सावंतवाडी मर्कझी जमात , बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी , प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालक – शिक्षक संघ कार्यकारीणी समितीचे पदाधिकारी यांनी कु . नहुष याचे अभिनंदन केले व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .
