Headlines

पर्यावरणपूरक किल्ले व आकाशकंदील स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्येष्ठ नागरिक संघाचे आयोजन

बांदा/प्रतिनिधी
ज्येष्ठ नागरिक विकास मंच, बांदा पंचक्रोशी यांच्या वतीने दीपावलीनिमित्त आयोजित पर्यावरणपूरक आकाशकंदील व किल्ले स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बुधवारी (ता. १८) श्रीराम चौक, बांदा येथे उत्साहात पार पडला. या दोन्ही स्पर्धांना बालचमू व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मुलांनी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून आकर्षक आकाशकंदील व ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या होत्या.
आकाशकंदील स्पर्धेत मेघराज गवस याने प्रथम, नैतिक मोरजकर याने द्वितीय, तर धनश्री देसाई हिने तृतीय क्रमांक पटकावला.
पर्यावरणपूरक किल्ले स्पर्धेत गवळीटेंब येथील शिवमावळा ग्रुपच्या रायगड किल्ल्याने प्रथम क्रमांक मिळविला. या किल्ल्याची निर्मिती लौकिक तळवडेकर याने केली. निमजगा येथील शिवशंभो ग्रुपच्या सिंहगड किल्ल्याला (रिया गडेकर व सानवी नाईक) विभागून द्वितीय क्रमांक मिळाला. मेघराज गवस याच्या पांडवगड किल्ल्यालाही विभागून द्वितीय क्रमांक देण्यात आला. रामा मालवणकर याच्या जंजिरा किल्ल्याने तृतीय क्रमांक मिळविला, तर लविथ गोवेकर याच्या शिवनेरी किल्ल्याला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
या पारितोषिक वितरण समारंभाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अन्वर खान, बांदा तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत, ज्येष्ठ सदस्य प्रकाश पाणदरे, मंचचे अध्यक्ष हनुमंत मालवणकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व पारितोषिक विजेत्या स्पर्धकांचा स्मृतिचिन्ह, रोख पारितोषिक व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंचचे अध्यक्ष हनुमंत मालवणकर यांनी केले. गुरुनाथ नार्वेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर उपाध्यक्ष भिकाजी धुरी यांनी आभार मानले.
यावेळी उपाध्यक्ष निकिता मोरजकर, अर्चना सावंत, महादेव वसकर, हरिश्चंद्र भिसे, उत्तम देसाई, गुरुनाथ बांदेकर, जगन्नाथ सातोस्कर, प्रकाश शिर्के, महादेव बांदेकर, सुकाजी गावडे, रियाज खान, सुभाष नाईक, अनिल नाईक, संजय देसाई, सर्व संचालक, पालकवर्ग व किल्ले निर्मिती करणारी मुले मोठ्या संख्येने उपस्थित होती.
स्पर्धांच्या माध्यमातून मुलांमध्ये ऐतिहासिक किल्ल्यांविषयी अभिमान, सर्जनशीलता आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण होत असल्याचे या उपक्रमातून दिसून आले.

You cannot copy content of this page