Headlines

झोळंबे येथील श्री पांडुरंग मंदिरात कार्तिकी एकादशी उत्सवाचे आयोजन

बांदा/प्रतिनिधी
वै. ह. भ. प. प. पू. सद्गुरू वासुदेव महाराज वझे यांच्या आश्रयाखाली सुरू असलेल्या झोळंबे येथील श्री पांडुरंग मंदिरात कार्तिकी एकादशीनिमित्त शुक्रवार दिनांक २० ते रविवार दिनांक २२ नोव्हेंबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त शुक्रवार २० नोव्हेंबर रोजी रात्री दशमी ज्योती पूजन होणार असून, त्यानंतर रात्री ८ वाजता हरिपाठाने उत्सवाला प्रारंभ होईल. शनिवार २१ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता काकड आरती व महापूजा, सकाळी भजन, सायंकाळी ७ वाजता हरिपाठ आणि त्यानंतर रात्री ग्रामस्थांची भजने होणार आहेत.
रविवार २२ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता काकड आरती, त्यानंतर महापूजा व भजनाचा कार्यक्रम होईल. सकाळी ११ वाजता दिंडी काढण्यात येणार असून, त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. महाप्रसादाने तीन दिवसीय धार्मिक उत्सवाची सांगता होणार आहे.
या उत्सवात परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री पांडुरंग मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
फोटो:-

You cannot copy content of this page