संजू परब यांची उपस्थिती: मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव..
⚡बांदा, ता. १८-: मडुरा येथील सामाजिक कार्यकर्ते बंटी परब यांचा वाढदिवस शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर, मित्रपरिवार आणि हितचिंतकांनी बंटी परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

बंटी परब हे मडुरा गावातील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. सामाजिक क्षेत्रातील त्यांचा सक्रिय सहभाग आणि सर्वांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध यामुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे. याच प्रेमापोटी वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. उत्साही वातावरणात हा वाढदिवस सोहळा साजरा झाला.
