Headlines

वेंगुर्ला श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रौत्सव २४ नोव्हेंबर रोजी…

⚡वेंगुर्ला ता.१८-: वेंगुर्ला ग्रामदेवता श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रौत्सव
त्रिपूरारी पौर्णिमेला मंगळवार दि. २४ नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे.
यनिमित्त सकाळी ८ वा. श्री देवी सातेरीची पाद्यपूजन,
सकाळी ९ वा. श्री देवी सातेरीच्या पालखीचे आगमन, सकाळपासून केळी नारळ ठेवणे, ओटी भरणे, रात्रौ ११ वा. श्री देव रामेश्वराची पालखी भेट,
तरंगदेवता, श्री देव रामेश्वर, श्री देवी सातेरी यांच्या पालखीसह मंदिरास पालखी प्रदक्षिणा, यावेळी शोभेच्या दारूसामानाची व फटाक्यांची आतषबाजी,
त्यानंतर रात्रौ श्री पार्सेकर दशावतार मंडळाचा महान पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे.
उत्सवानिमित्त, पुष्पपुजा, मंदिरात खास फुलांची आकर्षक सजावट व संपूर्ण मंदिरास नयनरम्य विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. भाविकांनी दर्शनाचा व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वस्त मंडळ, श्री देवी सातेरी देवस्थान, वेंगुर्ले यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page