Headlines

बांदा नट वाचनालयाच्या नऊ संचालकांची बिनविरोध निवड

सन २०२६ ते २०२९ या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवड

बांदा/प्रतिनिधी
बांदा येथील शतायु ग्रंथालय असलेल्या नट वाचनालयाच्या सन २०२६ ते २०२९ या कालावधीसाठी होणाऱ्या त्रैवार्षिक निवडणुकीत नऊ संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे. नऊ जागांसाठी नऊच उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले.
निवड झालेल्या संचालकांमध्ये जगन्नाथ शांताराम सातोसकर, सौ. अर्चना चंद्रकांत सावंत, राकेश किसनदास केसरकर, निलेश तुकाराम मोरजकर, गुरुनाथ आत्माराम नार्वेकर, नागेश विठ्ठल सावंत, सुधीर नारायण साटेलकर, हेमंत अरुण मोर्ये आणि शंकर मंगेश नार्वेकर यांचा समावेश आहे.
या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रा. एस. व्ही. नाईक यांनी काम पाहिले. सर्व जागांवर बिनविरोध निवड झाल्याने वाचनालयाच्या आगामी तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी संचालक मंडळाची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नवनिर्वाचित संचालकांचे वाचनप्रेमी, सभासद आणि बांदा परिसरातून अभिनंदन होत आहे. लवकरच पदाधिकारी निवड प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे वाचनालयाने स्पष्ट केले आहे.
फोटो:-
बांदा येथे नवनिर्वाचित संचालक मंडळाला निवडीचे पत्र देताना निवडणूक अधिकारी एस व्ही नाईक.

You cannot copy content of this page