बांदा/प्रतिनिधी
घारपी येथील स्वामी समर्थ मठात गुरुवार दिनांक १९ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता ‘भुवनेश्वरी भ्रामरी अवतार’ या भव्य दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री भूमिका मायापूर्वचारी दशावतार नाट्यमंडळाचे मालक नारायण आसयेकर यांच्या मंडळातर्फे हा नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. दशावतारातील विविध पौराणिक पात्रे, रंगतदार अभिनय आणि पारंपरिक नाट्यशैलीतून हा प्रयोग रसिकांना पाहायला मिळणार आहे.
स्वामी समर्थ भक्त मंडळी आणि घारपी ग्रामस्थ मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वामी समर्थ मठ, घारपी येथे होणाऱ्या या नाट्यप्रयोगाचा दशावतारप्रेमी आणि नाट्यरसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

