मालवण (प्रतिनिधी)

मालवण तालुक्यातील चौके-आंबेरी येथील देव सकलेश्वराचा जत्रोत्सव बुधवार दि. २ डिसेंबर रोजी साजरा होणार आहे.
यानिमित्त सकाळपासून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. चौके येथील देवी भराडी मातेची पालखी संपूर्ण आंबेरी गावातून फिरून सकलेश्वर मंदिरात आल्यानंतर मंदिर परिसरात पालखी मिरवणूक होणार आहे. रात्री चेंदवणकर-गोरे दशावतार नाट्य मंडळ, कवठीचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. दुसऱ्या दिवशी गाडगे फोडून झाल्यानंतर मानकऱ्यांचा सन्मान स्वीकारून देवी भराडी मातेची पालखी आपल्या मूळ जागेवर म्हणजे चौके गावात येण्यास निघते. चौके येथे पालखी आली, की चार दिवस सुरू असलेल्या जत्रोत्सवाची सांगता होते. जत्रोत्सवाला ‘बहीण-भाऊ भेट म्हणून ओळखले जाते. भाविकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन गावडे, परब मानकरी मंडळींनी केले आहे.
