Headlines

ठाकरे सेनेचे शहर प्रवक्ते आशिष सुभेदार यांचे अल्पशा आजाराने निधन…

वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास;
सावंतवाडीच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात शोककळा..

⚡सावंतवाडी, ता. १८-: उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी शहर प्रवक्ते तथा सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार (वय ३१) यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने सावंतवाडीच्या राजकीय, सामाजिक आणि युवा क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.

गेल्या काही दिवसांपासून आशिष सुभेदार यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर गोव्यातील बांबोळी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी त्यांचे निधन झाल्याने कुटुंबीय, मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
माजी आमदार तथा शिवसेना नेते परशुराम उपरकर यांचे अत्यंत विश्वासू आणि कट्टर कार्यकर्ते म्हणून आशिष सुभेदार यांची ओळख होती. पक्षसंघटनेप्रती असलेली निष्ठा, नेतृत्वावरील विश्वास आणि कार्यकर्त्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध ही त्यांची खास वैशिष्ट्ये होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी सावंतवाडी तालुक्यातील विविध सामाजिक आणि संघटनात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता.
त्यांच्या अकाली निधनाने एक उमदा युवा कार्यकर्ता हरपल्याची भावना व्यक्त होत असून राजकीय व सामाजिक क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

You cannot copy content of this page