वेंगुर्ला
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जागृत देवस्थान व “केळ्यांच्या घडाची नवसाची जत्रा” म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसिद्धीस पावलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील आरवली श्री देव वेतोबा देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार 9 डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त सकाळी पूजन, केळी, नारळ ठेवणे, नवस फेडणे, रात्री पालखी प्रदक्षिणा, फटाक्यांची आतषबाजी, पहाटे नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यकंपनीचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. दुसऱ्या दिवशी गुरुवारी 10 डिसेंबर रोजी सकाळी 10 वा. ” तुलाभार” कार्यक्रम संपन्न होणार असून सकाळी 10 वा. ते दुपारी 1 वा. या वेळेत वेतोबा देवस्थान तर्फे कलाकारांचा गुणीजन गौरव हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तसेच 10 डिसेंबर रोजी येथील सातेरी जत्रोत्सव संपन्न होणार आहे. भाविकांनी जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव वेतोबा देवस्थान कमिटी आरवली यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

