Headlines

हडी येथील कालिका देवी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव व दीपोत्सव

अभिनेत्री अलका कुबल यांची लाभणार उपस्थिती

मालवण : (प्रतिनिधी)

मालवण तालुक्यातील हडी येथील श्री स्वयंभू कालिका देवी मंदिरात मंगळवार दि. २४ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवानिमित्त भव्य दीपोस्तवाचे आयोजन करण्यात आले आहे. देवस्थान कमिटी हडी व तरुण मित्रमंडळ हडी, खालचीवाडी यांच्यावतीने आयोजित या उत्सवात दिवसभर विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदियाळी असणार आहे.

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून मराठी चित्रपटसृष्टीतील ‘माहेरची साडी” या चित्रपटातून घराघरात पोहोचलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांची या सोहळ्यात प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून दीपोस्तवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

यानिमित्त सकाळी ६ वाजता. देवीच्या मंगलस्नान, ८.३० वाजता महाअरती, ११ वाजता गावराठीचे कालिका देवी मंदिरमध्ये आगमन, सायंकाळी ७ वाजता भव्यदिव्य असा दीपोस्तव (वर्ष १६ वे), सायंकाळी ७.३० वाजता महाप्रसाद, ८ वाजता माऊली वारकरी दिंडी मोर्य, १० वाजता गडगेवाडी सेवा मंडळ हडी यांचे भजन, ११ वाजता पुरोहितांकडून पोथी (भगवतगीता) वाचन व बारापाच मानकरी यांच्या हस्ते गणेश पूजन, १२ वाजता गावराठी व पालखी प्रदक्षिणा सोहळा यामध्ये मुख्य आकर्षण श्री देव गावडेपुरुष भेट सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, पावणाईदेवी जागर उत्सव शनिवार २८ नोव्हेंबर ते सोमवारी ३० नोव्हेंबर या कालावधीत साजरा होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page