मालवण दि प्रतिनिधी

मालवण येथील भंडारी ए सो हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय मालवणची इयत्ता आठवीत शिक्षण घेत असलेली विध्यार्थिनी कुमारी दुर्वा नंदकिशोर राणे हीची कबड्डी स्पर्धेच्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी २०२६ साठी निवड करण्यात आली आहे.
कुमारी दुर्वा राणे हिला क्रीडा शिक्षक आर बी देसाई, श्री हरिश्चन्द्र साळुंखे यांची मार्गदर्शन लाभले कुमारी दुर्वा नंदकिशोर राणे हीच्या या निवडीबद्दल भंडारी एज्यू सोसायटी मालवणचे अध्यक्ष विजय पाटकर , ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, मुख्याध्यापक आर डी बनसोडे व संस्था चालक, पदाधिकारी, मार्गदर्शक शिक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
दुर्वा नंदकिशोर राणे हीची
मेहनत व जिद्द तसेच तिला प्रशालेतील शिक्षकांचे मिळणारे योग्य मार्गदर्शन त्यामुळे हे यश ती प्राप्त करू शकली . संस्थेला व प्रशालेला तिचा अभिमान असून तिच्या या राज्यस्तरीय निवडीमुळे प्रशालेच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला गेला असल्याची भावना संस्था पदाधिकारी व प्रशालेचे शिक्षक यांनी व्यक्त केली आहे.
