Headlines

सावंतवाडी विठ्ठल मंदिरात २१ नोव्हेंबरला कार्तिकी महाएकादशी सोहळा…

भजन, कीर्तन, भक्तिसंगीत आणि पालखी सोहळ्याचे आयोजन..

सावंतवाडी ता.१९-: येथील श्री विठ्ठल मंदिरात शनिवार, दिनांक २१ नोव्हेंबर रोजी कार्तिकी महाएकादशी सोहळा विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त पहाटे ५.३० ते रात्री ११ वाजेपर्यंत दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ६ वाजता श्री विठ्ठल-रखुमाई यांची काकड आरती व महापूजा होणार असून, महापूजा श्री. हनुमंत बाबाजी सावंत व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत श्री. निलेश मेस्त्री यांच्या सद्गुरू संगीत विद्यालयातर्फे भक्तिसंगीताचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ४ ते ६ या वेळेत स्थानिक भजनी कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत ह.भ.प. श्री. स्नेहलदीप सामंत यांचे कीर्तन होणार असून, त्यानंतर रात्री ९ वाजता श्रींचा पालखी सोहळा पार पडणार आहे.
तसेच कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजेच २४ नोव्हेंबरपर्यंत दररोज सायंकाळी ६ वाजता कीर्तन व रात्री ८ वाजता श्रींची पालखी सेवा आयोजित करण्यात आली आहे. या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन श्री विठ्ठल मंदिर स्थानिक उपसमितीच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page