Headlines

वेंगुर्ला पंचायत समितीच्या वतीने अणसूर ग्रामपंचायतीचा सन्मान

वेंगुर्ला
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये वेंगुर्ला तालुक्यातील अणसूर ग्रामपंचायतीने जिल्ह्यात प्रथम पटकावीला आहे. याबाबत वेंगुर्ला पंचायत समितीच्या वतीने अणसूर ग्रामपंचायतचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सभापती शंकर घारे , पं. स. उपसभापती सचिन देसाई, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, कृषी विस्तार अधिकारी प्रशांत चव्हाण, शिवसेना वेंगुर्ला शहरप्रमुख अजित राऊळ, पाणी पुरवठा विभागाच्या द्रौपदी नाईक या सर्वांच्या वतीने अणसूर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत अधिकारी, सर्व सदस्य, सीआरपी, कृषी सखी, पशुसखी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशासेविका, ग्रामस्थ, महिला या सर्वांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच सत्यविजय गावडे, उपसरपंच वैभवी मालवणकर, सदस्य संयमी गावडे, साक्षी गावडे, सीमा गावडे, प्रज्ञा गावडे, मुख्याध्यापक बाबुराव मळगावकर, सीआरपी शिला देऊलकर, कृषी सखी दिशा गावडे, पशुसखी विनया गावडे, अंगणवाडी सेविका भक्ती गावडे, मदतनीस, अन्नपूर्णा गावडे, आशासेविका अनुष्का तेंडोलकर, वैशाली गावडे, भूमी गावडे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page