Headlines

जागतिक शौचालय दिनानिमित्त पेंडूर येथे सार्वजनिक शौचालयाचे लोकार्पण…

⚡वेंगुर्ला ता.१९-: जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून गुरुवार दि. १९ नोव्हेंबर रोजी वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामपंचायत पेंडूर येथे सार्वजनिक शौचालयाचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाला वेंगुर्ला गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, गटसमन्वयक द्रौपदी नाईक, पेंडूर सरपंच संतोष गावडे, उपसरपंच मिलिंद गावडे, ग्रामपंचायत अधिकारी सोमा राऊळ, पेंडूर ग्रामविकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष सिताराम गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरपंच संतोष गावडे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या हस्ते फीत कापून सार्वजनिक शौचालयाचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी, पेंडूर ग्रामस्थ नंदकिशोर चव्हाण, महेश गावडे, प्रीती मुणगेकर, ज्योती मुणगेकर, शैलेंद्र सावंत, पोस्टमन अजित जाधव, गोपाळ शिरोडकर, शंकर परब, ग्रा. पं. कर्मचारी घनश्याम नाईक, वैशाली नाईक आदी उपस्थित होते.
स्वच्छता, आरोग्य आणि सार्वजनिक सुविधांचे महत्त्व लक्षात घेता ग्रामपंचायत पेंडूरच्या वतीने उभारण्यात आलेली ही सार्वजनिक शौचालयाची सुविधा ग्रामस्थांसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. ‘स्वच्छ शौचालय, गरिमामय भविष्य’ या संदेशातून स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी गावाच्या निर्मितीसाठी ग्रामपंचायत पेंडूरने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

फोटो :

You cannot copy content of this page