Headlines

सांगुळवाडी-मगावाडी येथे बिबट्याचा वावर….

माजी सरपंच राधीका शेळके यांच्या घराच्या अंगणात बिबट्या सीसीटीव्हीत कैद…

⚡वैभववाडी ता.२०-: सांगुळवाडी-मगावाडी येथे शुक्रवारी पहाटे बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सांगुळवाडी गावच्या माजी सरपंच राधिका शेळके यांच्या घराच्या अंगणात बिबट्या फिरत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

शुक्रवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या थेट घराच्या अंगणात आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. ही घटना समोर आल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गावाच्या लोकवस्तीमध्ये बिबट्याचा वावर वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेषतः पहाटेच्या वेळी घराबाहेर पडणारे नागरिक, शेतकरी, महिला व लहान मुलांच्या सुरक्षेची चिंता व्यक्त केली जात आहे.
वनविभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन परिसरात पाहणी करावी, बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे तसेच नागरिकांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

You cannot copy content of this page