Headlines

दुकान गाळे प्रकरणी प्रशासनाची कारवाई…

श्रेयस मुंज यांच्या तक्रारीची दखल; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशीची मागणी..

⚡सावंतवाडी, ता. २०-: शहरातील पालिकेच्या वादग्रस्त दुकान गाळ्यांना आज प्रशासनाकडून पुन्हा सील करण्यात आले. या प्रकरणी माठेवाडा येथील तक्रारदार श्रेयस मुंज यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे.

या प्रकरणी संबंधित विभागाने ७ मे रोजी पत्र पाठवून हे प्रकरण नगरविकास विभागाकडे वर्ग केले आहे. तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार या प्रकरणाची चौकशी करायची असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) अधिकृत करण्याची विनंती करण्यात आली आहे.दरम्यान, वादग्रस्त दुकान गाळ्यांवर पुन्हा सीलची कारवाई करण्यात आल्याने या प्रकरणाला नव्याने महत्त्व प्राप्त झाले असून, पुढील प्रशासकीय कारवाईकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

You cannot copy content of this page