Headlines

वेतोरे श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव 29 नोव्हेंबर रोजी

मुंबईसह गोवा कोल्हापूर बेळगाव रत्नागिरी येथील भाविकांचे श्रद्धास्थान

वेंगुर्ला
नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी अशी ख्याती पावलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे ग्रामदेवता श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव रविवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त सकाळी विधिवत पूजा, केळी नारळ ठेवणे, माहेरवाशींणी ओटी भरणे, तसेच येथील श्री देव वेतोबा मंदिरात केळी ठेवणे आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. रात्री उशिरा पालखी प्रदक्षिणा, फटाक्यांची आतषबाजी खानोलकर दशावतार नाट्यकंपनीचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. भाविकांनी जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच वेतोरे येथील श्री सोमेश्वर जत्रा २६ नोव्हेंबर रोजी होणार असुन खानोलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.

You cannot copy content of this page