AALT व Central Christian University Singapore तर्फे सन्मान; लेझर थेरपीतील प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण
कणकवली : कणकवली येथील प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. धैर्यशील चंद्रकांत राणे यांनी लेझर थेरपी क्षेत्रातील अभ्यासक्रम, क्लिनिकल प्रशिक्षण, कौशल्य मूल्यांकन तसेच व्यावसायिक विकासाच्या आवश्यक बाबी यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल Asian Academy of Laser Therapy (AALT) व Central Christian University, Singapore यांच्या वतीने ‘Associate Fellow in Dental Laser Therapy’ ही फेलोशिप प्राप्त केली आहे.
या प्रशिक्षणामध्ये Laser Physics, Laser Safety, Clinical Applications तसेच Evidence-Based Photomedicine या महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश होता. लेझर तंत्रज्ञानाचा दंतचिकित्सेमध्ये सुरक्षित व प्रभावी वापर, त्याच्या क्लिनिकल उपयोगाचे ज्ञान आणि आधुनिक उपचारपद्धतींबाबतचे कौशल्य या प्रशिक्षणातून अधिक विकसित झाले.
लेझर दंतचिकित्सा क्षेत्रातील व्यावसायिक कौशल्यवृद्धीच्या दृष्टीने ही फेलोशिप महत्त्वपूर्ण मानली जात असून, डॉ. राणे यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीतील ही उल्लेखनीय कामगिरी आहे.
डॉ. धैर्यशील चंद्रकांत राणे यांच्या या यशाबद्दल कणकवली शहरासह परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
