Headlines

दांडी येथे गोवा बनावटीच्या दारूवर पोलिसांची धाड;

५.३८ लाखांचा मद्यसाठा जप्त
तिघांवर गुन्हा दाखल

मालवण (प्रतिनिधी) :

मालवण शहरातील दांडी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर गोवा बनावटीच्या दारू विक्रीवर मालवण पोलिसांनी शनिवारी रात्री धडक कारवाई केली. या छाप्यात तब्बल ५ लाख ३८ हजार रुपये किमतीचे ८० बॉक्स दारू जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालवण शहरातील
दांडी परिसरात एका महिलेच्या माध्यमातून गोवा बनावटीच्या दारूची अवैध विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता मोठ्या प्रमाणात मद्यसाठा आढळून आला. पोलिसांनी हा संपूर्ण साठा जप्त केला.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने, पोलीस उपनिरीक्षक भगत, अभिजित भोसले, पोलीस हवालदार सुहास पांचाळ आणि सुप्रिया पवार यांचा समावेश होता.

You cannot copy content of this page