Headlines

भाजपा श्री’ बॉडीबिल्डिंग स्पर्धेची जोरदार तयारी…

युवकांमध्ये उत्साह; फिट इंडिया संकल्पनेतून भव्य स्पर्धेचे आयोजन..

⚡सावंतवाडी ता.०१-: भाजपा सिंधुदुर्ग व भाजपा युवा मोर्चाच्या वतीने आज आयोजित करण्यात आलेल्या भव्य बॉडीबिल्डिंग स्पर्धेची अर्थात ‘भाजपा श्री’ स्पर्धेची जोरदार तयारी सुरू आहे. या स्पर्धेबाबत युवकांसह ‘जेन झी’मध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, सावंतवाडी शहरात या स्पर्धेची चर्चा रंगली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया’ संकल्पनेतून या भव्य बॉडीबिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होत आहे.

भाजपा युवा मोर्चा सावंतवाडी अध्यक्ष हितेन नाईक व आंबोली अध्यक्ष विनेश तावडे यांच्या आयोजनातून स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर तसेच युवा आयडॉल विनोद राऊळ उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावा रात्री महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशाल परब व उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी घेतला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजकांकडून आवश्यक नियोजन व तयारीला वेग देण्यात आला आहे. युवकांमध्ये शरीरसौष्ठव, व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.”

You cannot copy content of this page