भाजपच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गौरव व खाऊ वाटप

⚡वेंगुर्ला ता.२०-: सिंधुदुर्ग चे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस पूर्ण जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. याच वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी मातोंड, वेंगुर्ला यांच्या तर्फे येथील न्यू इंग्लिश स्कूल मातोंड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा किसान मोर्चा सरचिटणीस बाळू प्रभु, किशोर परब, सोसायटी संचालक ज्ञानेश्वर केळजी, शक्ती केंद्र प्रमुख ताता मेस्त्री, डॉ. कांडरकर, ग्रामपंचायत सदस्य सिताराम जाधव, बूथ प्रमुख बाळा मोहिते, मातोंड सोसायटी चेअरमन मकरंद प्रभु, बूथ प्रमुख शेखर परब, श्रीकांत परब, नंदकिशोर घाडी, सिताराम तुळसकर, सत्यवान परब, सुधाकर परब, अण्णा मातोंडकर यांच्यासाहित भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page