चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले असताना सीसीटिव्ही बंद हे भूषणावह नाही

शांतता समिती बैठकीत उपस्थितांची तीव्र नाराजी

सावंतवाडी दि.२० सप्टेंबर (प्रतिनिधी)
येता नवरात्र उत्सव शांततेत , निर्भय वातावरणात साजरा करण्याचे आवाहन पोलीस उपनिरीक्षक अमित गोते यांनी केले.
यावेळी शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून सीसीटीव्ही कॅमेरे बंद असणे भूषणावह नाही असे उपस्थित सदस्यांनी स्पष्ट केले.

यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सोनुर्ली मंदिरातील चोरीसह कोलगाव, सावंतवाडी शहरात वाढलेल्या चोऱ्या बाबत चिंता व्यक्त करून सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
सावंतवाडी पोलीस ठाण्यात नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आज शांतता समितीची बैठक पोलीस उपनिरीक्षक अमित गोते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, राजू बेग, अफरोज राजगुरू, रवींद्र मडगावकर, सिताराम गावडे सुरेश भोगटे, अभिमन्यू लोंढे, रफिक मेमन, ऑगस्तीन फर्नांडिस, रवी जाधव आदी उपस्थित होते
सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये १५ ठिकाणी सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरे होत आहेत. मंदिरामध्ये घटस्थापना आणि सार्वजनिक, खाजगी ठिकाणी देवीचा उत्सव साजरा होत आहे, तो दरवर्षी शांततेत साजरा केला जातो. देवीच्या उत्सवाला गालबोट लागू नये म्हणून प्रत्येक नागरिक काळजी घेतो असे पोलीस उपनिरीक्षक अमित गोते यांनी सांगितले. पोलीस शांतता, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण त्याला जनतेकडून सहकार्य लाभावे असे ते म्हणाले.

नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने देवीची मिरवणूक, आगमन होते. या ठिकाणचे रस्ते सुस्थितीत असावेत. विद्युत खंडित होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशी मागणी उपस्थित सदस्यांनी केली. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, नवरात्र उत्सव हा शांततेत व उत्साह साजरा केला जातो. सोनुर्ली येथील श्रीदेवी माऊली मंदिरातील चोरीला एक महिना उलटला आहे. गाभाऱ्यापर्यंत जाऊन चोरी करणारा सीसीटीव्ही कॅमेरात कैद होऊन देखील तो अद्यापही सापडला नाही. सावंतवाडी शहरासह कोलगाव मध्ये लहान मोठ्या चोऱ्या झालेल्या आहेत त्या चोरीचा तपास व्हावा.

ऑगोस्तीन फर्नांडिस म्हणाले, सर्वोदय नगर मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले पाहिजेत. त्या ठिकाणी चोरांचे प्रमाण वाढणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अमित गोते यांनी सीसीटीव्ही कॅमेरे सुस्थितीत करण्यासाठी ठेकेदाराला निर्देश दिलेले आहेत असे सांगितले.
यावेळी रवींद्र मडगावकर म्हणाले, सांगेली शिरशिंगे दशक्रोशी मध्ये पोलिसांनी आठवड्यातून एकदा तरी गस्त घालावी. यावेळी सुरेश भोगटे म्हणाले, सावंतवाडी बस स्थानकावर चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे हे लक्षात घेता सीसीटीव्ही कॅमेरे बरोबरच पोलीस देखील उपस्थित राहिले तर चोरांचे प्रमाण वाढणार नाही असे ते म्हणाले.
यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, सबनिसवाडा येथील रमेश ठाकूर खून प्रकरण फाईल बंद करू नका. या प्रकरणी चौकशी सुरू आहे किंवा नाही हे समजून येत नाही. कोणालाही अटक झाली नाही. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करावी, प्रकरण फाईल बंद करू नये तसेच नवरात्र उत्सव निर्भय वातावरणात व्हावा.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक अमित गोते म्हणाले, बंद बंगले फोडण्याकडे चोरांचे प्रमाण दिसत आहे. तरीही रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढविली जात आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून चोर पकडून देण्यात सहकार्य मिळत आहे. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

You cannot copy content of this page