सावंतवाडी-::पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असणाऱ्या व्हॉइस ऑफ मीडिया संघटना (व्ही. ओ. एम. इंटरनॅशनल फोरम)ची नूतन कार्यकारिणी परभणी येथील राज्यस्तरीय मेळाव्यात जाहीर करण्यात आली. या कोअर कमिटीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष जय भोसले यांची निवड करण्यात आली आहे.
व्ही. ओ. एम. इंटरनॅशनल फोरमचा राज्यस्तरीय मेळावा व नूतन पदाधिकारी पदग्रहण सोहळा परभणी येथे रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी या संघटनेच्या १४ जणांची कोअर कमिटी जाहीर करण्यात आली.सध्या ७८ देशात कार्यरत असणाऱ्या या संघटनेच्या नूतन कोअर कमिटीचे प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे व पदाधिकारी यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
या १४ जणांच्या कोअर कमिटीमध्ये जय भोसले (सिंधुदुर्ग),नागेश कल्याण (नायगाव),संजय बद्रापुरे (वसमत),गिरीश देशमुख(वसमत),सुहास वेताळ (भिंडा नेवासा),रियाज मुल्ला (कोंडवा पुणे),रुपेश जाधव (नंदुरबार),दिलीप साळुंखे (नाशिक),गौतम वाघ (कल्याण),सय्यद सलीम (पुणे),कैलास निढोट(नागपूर लातूर),सोमनाथ पवार (सोलापूर),इर्शाद शेख (पुणे),रश्मी भदरगे (सेलू) यांचा सामावेश आहे.
जय भोसले यांच्या निवडीचे सिंधुदुर्ग व्हॉइस मीडिया संघटनेतर्फे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष शैलेश मयेकर, विभाग अध्यक्ष विष्णू धावडे,राज्य संघटक समीर म्हाडेश्वर, परेश राऊत आदी उपस्थित होते.
व्ही. ओ. एम. इंटरनॅशनल फोरमच्या राज्य कोअर कमिटीवर जय भोसले
