भाजप युवा नेते विशाल परब यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना…
⚡सावंतवाडी ता.०९-: देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी कलंबिस्त येथील रणस्तंभ येथे भाजप युवा नेते विशाल परब यांनी उपस्थित राहून वीर हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. सन १९१४ ते १९१८ या कालावधीत झालेल्या पहिल्या महायुद्धात शौर्य गाजविणाऱ्या वीरांच्या स्मरणार्थ रणस्तंभास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
यावेळी देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या शौर्य, त्याग आणि देशभक्तीचे स्मरण करण्यात आले. त्यांच्या त्यागातून आजच्या पिढीने प्रेरणा घेऊन राष्ट्रहितासाठी कार्य करावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.
या कार्यक्रमास माजी सैनिक प्रकाश सावंत, सगूण पास्ते, दत्ताराम घोगळ, रामचंद्र सावंत, बाबल अल्मेडा, बाबुराव कविटकर, पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत, निखिल बिडये, प्रवीण सावंत, रवींद्र मेस्त्री, माजी सरपंच शरद नाईक, समीर राजगिर, महादेव जंगम, भरत म्हाडगुत, विनेश तावडे यांच्यासह समस्त देवकर-गावकर मंडळी उपस्थित होती.
रणस्तंभ येथे झालेल्या या कार्यक्रमातून वीर हुतात्म्यांच्या त्यागाला उजाळा देत त्यांच्या स्मृतींना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.
